शिवसैनिकाचे असेही अर्धशतक

शिवाजी पार्क - दसरा मेळावा ही प्रत्येक शिवसैनिकासाठी जिव्हाळ्याची बाब. त्यामुळे कट्टर शिवसैनिक दसरा मेळावा चुकवत नाहीत. अशा शिवसैनिकांपैकी एक म्हणजे माहीममधील ज्येष्ठ शिवसैनिक गिरीश पाटील. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा 50 वा दसरा मेळावा होता आणि हे सर्व मेऴावे याची देही याची डोळा पाहत पाटील यांनी अनोखे अर्धशतकच पूर्ण केले आहे. गेल्या 20 वर्षांपासून व्हील चेअरवर असूनही शिवसेनेवर नितांत निष्ठा असलेले गिरीश पाटील हे दसरा मेळाव्याला हजर राहतात. या वेळी आठवणींना उजाळा देताना पाटील म्हणाले, 'शिवसेना स्थापन झाल्यापासून आजपर्यंत मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. मी बाळासाहेबांचा काळ पाहिला. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेनेत काही राम नाही राहिला, असे म्हणणाऱ्या लोकांसमोर उद्धव ठाकरेंनी तेवढ्याच हिमतीने वाढवलेली शिवसेना पाहिली. मी बाळासाहेबांनंतर उद्धव साहेब आणि आता उद्धव साहेबांबरोबरच आदित्य साहेंबांचीही कारकीर्द पाहत आहे. गेली 50 वर्षे मी शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान वाटत आहे".

पुढील बातमी
इतर बातम्या