मग, संजय राऊत बोलत असल्यानेच संशय वाढलाय- नारायण राणे

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा काहीही संबंध नाही, असं जर शिवसेनेचं म्हणणं असेल, तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत या प्रकरणार वारंवार प्रतिक्रिया का देत आहेत? असा प्रश्न भाजप खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. (why shiv sena mp sanjay raut defending aaditya thackeray in sushant singh rajput suicide case ask bjp mp narayan rane)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मी कधीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलेलं नाही. मीडियातूनच त्यांच्या नावाचा उल्लेख केला जात आहे. सुशांतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयाने त्यावर निर्णय घ्यावा. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं शिवसेना नेते संजय राऊत बोलत आहेत. आदित्यचा या प्रकरणाशी संबंधच नाही तर राऊत का बोलत आहेत? राऊत वारंवार बोलत असल्यानेच या प्रकरणात संशय अधिक वाढला आहे, अशी शंकाही नारायण राणे यांनी उपस्थित केली.

हेही वाचा - सरकारचे सगळे पूल मजबूत- संजय राऊत

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात अजेंडा सेट करून आदित्य ठाकरे यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा अजेंडा दिल्लीतून सेट झाला असून त्यात काही माध्यमं देखील सहभागी आहेत. परंतु माध्यमांनी कुठंही वृत्त चालवण्याआधी खरं-खाेटं तपासून घ्यायला हवं. महाराष्ट्रातील सरकार उत्तम रितीने चाललेलं असल्याने भाजप नेत्यांची पोटदुखी वाढली आहे, त्यातूनच हे खोटे आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नाही. चाैकशीअंती सर्व सत्य आपोआपच बाहेर येईल, असा दावा संजय राऊत यांनी केला होता.

महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही. हे सरकार पूर्ण ५ वर्षे टिकणार आहे. पूल बिहारमध्ये पडलेत. आधीच्या सरकारने बांधलेले पूल पडले आहेत. विरोधकांनी आम्हाला कोणतेही सल्ले देऊ नयेत. उद्धव ठाकरे सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार ५ वर्षे चालणार यात आमच्या कोणाच्याही मनात काही शंका नाही, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - भाजप आमदाराने पाठवली संजय राऊतांना नोटीस

पुढील बातमी
इतर बातम्या