राज ठाकरे काढणार वृत्तपत्र ?

मुंबई - मासिक किंवा वृत्तपत्र काढण्याची आपली इच्छा असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. इलेक्ट्रॉनिक मीडियातील काही पत्रकारांनी मिळून दिवाळी अंक काढला त्याचे प्रकाशन सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. तसेच ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार नोटबंदीवर आपली भूमिका मांडत नाहीत, भूमिका घेण्यास ते घाबरतात असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांना चिमटे काढलेत. आणीबाणीच्या काळात मोठ्या साहित्यिकांनी आणि पत्रकारांनी भूमिका घेतली होती असंही ते यावेळी म्हणाले. दर महिन्याला पत्रकारानं मासिक काढून आपली भूमिका सार्वजनिक करणं गरजेचं आहे कारण पेपर्स आणि चॅनलमध्ये भूमिका मांडता येत नाही असंही राज ठाकरे यावेळी म्हणालेत. न्यूज चॅनल्स काही बातमी चुकीची असेल तर माफी किंवा दिलगिरी मागत नाहीत, मात्र वृत्तपत्रामध्ये दिलगिरी व्यक्त केली जाते असंही राज यावेळी म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या