दक्षिण-मध्य मुंबईतील लक्झरी अपार्टमेंटच्या विक्रीत मोठी वाढ

एका नवीन अहवालानुसार दक्षिण-मध्य मुंबईतील लक्झरी अपार्टमेंटच्या विक्रीत ऑक्टोबरमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे लागू लॉकडाऊनमध्ये देखील रिअल इस्टेट विकासकांना मोठा वाव मिळाला आहे.

रिअल इस्टेट मार्केटच्या या क्षेत्रात मदत करण्यासाठी उत्सवात वेगवेगळी सूट आणि मुद्रांक शुल्क शुल्कात कपात या संयोजनामुळे रिअल इस्टेटमध्ये वाढ झाली आहे.

अनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट्सनं प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, ताडदेव, महालक्ष्मी, वरळी, प्रभादेवी, भायखळा आणि लोअर परेल यासारख्या परिसरातील वार्षिक मासिक विक्रीत २३० टक्क्यांहून अधिक म्हणजेच ५०० कोटींची वाढ झाली आहे. याउलट मागील वर्षी याच काळात विक्री १५० कोटी रुपये होती.

अनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट्सचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले की, “मुद्रांक शुल्कात मर्यादित कालावधीत कपात करण्याचा परिणाम मुंबईच्या अति-महागड्या लक्झरी घरांसह काही विभागांवर झाला आहे.”

“विकासकांकडून सध्या आलेल्या ऑफर्स या बाजारात विक्रीसाठीही जोर देतात. एकट्या मुद्रांक शुल्कामुळे खरेदीदारांना ४ कोटींच्या मालमत्तेवर किमान १२ लाखांची बचत होते. मालमत्तेची सरासरी किंमत वाढल्यामुळे बचत वाढते, असंही ते म्हणाले.

डिसेंबर अखेरपर्यंत राज्य सरकारनं मुद्रांक शुल्क ५ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत कमी केला होता. जानेवारी ते मार्च २१२१ या कालावधीत मुद्रांक शुल्क ३ टक्क्यांपर्यंत राहील. महामारीच्या काळात घर विक्री वाढवण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज आहे. परंतु यामुळे परिणामी सरकारच्या मुद्रांक शुल्कात लक्षणीय घट झाली आहे.

मालमत्ता विकसकांनी असं म्हटलं आहे की, यावर्षी सणाच्या हंगामात लक्झरी आणि प्रीमियम अपार्टमेंट विक्रीत वाढ होईल अशी अपेक्षा आहे. लोढाचे व्यवस्थापकीय संचालक गटातील  अभिषेक लोढा म्हणाले की, “ग्राहकांकडून तयार घरांसाठी पसंती आहे. मर्यादित तयार पुरवठा, मुद्रांक शुल्क, कमी व्याज दर आणि घर खरेदीला जास्त प्राधान्य यामुळे प्रीमियम आणि लक्झरी घरांची विक्री कायम राहील अशी अपेक्षा करतो,”


हेही वाचा

लॉकडाऊनमध्ये रिअल इस्टेट मार्केटमध्ये ६० टक्क्यांची वाढ

सिलेंडर डिलिव्हरीचे नवे नियम लागू

पुढील बातमी
इतर बातम्या