मुकेश अंबानी आता रियल इस्टेटमध्येही करणार धमाका

दोन-तीन वर्षांपूर्वी टेलिकॉम क्षेत्रात धमाका करून मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ कंपनीनं सर्व कंपन्यांचे धाबे दणाणून सोडले होते. अगदी कमी कालावधीत जिओ अनेकांच्या पसंतीस उतरली होती. टेलिकॉम क्षेत्राचा चेहरामोहरा बदलल्यानंतर मुकेश अंबानी आता रियल इस्टेट क्षेत्रात धमाका करण्याच्या तयारीत आहेत.

मेगासिटी उभारणार

रिलायन्स इंडस्ट्रिज मुंबईजवळ एक जागतिक दर्जाची मेगासिटी उभारण्याच्या तयारीत आहे. यासाठी ब्लू प्रिंटही तयार असल्याची माहिती व्यवसायाशी संबंधित माहिती देणाऱ्या एका वेबसाईटनं दिली आहे. हा मेगासिटी प्रकल्प रिलायन्स इंडस्ट्रिजचा सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पातील प्रत्येक हिस्सा हा वेगवेगळ्या प्रकल्पांएवढाच भव्यदिव्य असेल, अशी माहितीही समोर आली आहे.

सिंगापूरच्या धर्तीवर प्रकल्प

मुकेश अंबानी सिंगापूरच्या धर्तीवर हा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पापासून एअरपोर्ट, पोर्ट आणि सी लिंकलादेखील सहज कनेक्ट होता येईल. ५ लाखांपेक्षा अधिक लोक या ठिकाणी राहू शकतील, इतका भव्य प्रकल्प असणार आहे. यासाठी अंदाजे ७५ अब्ज डॉलर्सचा खर्च येण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प मुकेश अंबानी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. दूरसंचार क्षेत्रावर ज्याप्रमाणं रिलायन्स जिओचा प्रभाव पडला, तसाच प्रभाव रियल इस्टेट क्षेत्रातही पडेल, अशी शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा -

IRCTC उन्हाळ्यात पुरवते दररोज दीड लाख पाण्याच्या बाटल्या

मोबाईल तिकीटावर प्रवाशांना मिळणार ५ टक्के सूट


पुढील बातमी
इतर बातम्या