ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

कोकणनगर - भांडुपकर जेष्ठ नागरिकांना आधार देत, त्यांचा पुढील जीवन प्रवास सुखकर करण्यासाठी पंडित तुकाराम राजभोज सेवा संस्थेने पुढाकार घेतलाय. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून रविवारी कोकणनगर मैदानावर आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना व्हील चेअर, वाॅकर, ट्राय पाॅड, आरामखुर्ची आणि काठी अशा साहित्याचं वाटप करण्यात आलं. तसंच ज्येष्ठ नागरिक कार्ड ओळखपत्राच्या वाटपासही सुरुवात करण्यात आली असून हा कार्यक्रम वर्षभर चालेल, असं आयोजक अनिल राजभोज यांनी सांगितलं. कार्यक्रमाला मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदेही उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या