महिला शक्तीचा जागर

  • अर्जुन कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

अंधेरी - सध्याच्या धकाधकीच्या जीवनात संपूर्ण वेळ नोकरी आणि घरकामात करण्यातच जातो. त्यामुळे महिला शक्तीचा जागर या कार्यक्रमांतर्गत क्रांतीनगर इथल्या महिलांसाठी रांगोळी आणि मेहेंदी या स्पर्धेचं रविवारी आयोजन करण्यात आलं. शिवसेना विभाग संघटक राजुल पटेल आणि उप विभागप्रमुख राजू पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेचं आयोजन महिला शाखासंघटक कल्पना कोकणे आणि शाखाप्रमुख गोविंद वाघमारे यांनी केलं. या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.

पुढील बातमी
इतर बातम्या