कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं वाशी येथील एपीएमसी मार्केट ( मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती) ११ ते १७ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत एपीएमसी मार्केटमधील अन्नधान्य, भाजी, फळ, कांदा-बटाटा, मसाला मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहे.
यासंदर्भात शुक्रवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. अनेक व्यापारी संघटनांनी एपीएमसी प्रशासनाकडे मार्केट बंद ठेवण्याची मागणी केली. अखेर या बैठकीत मार्केट ११ ते १७ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. एपीएमसी मार्केट पुन्हा सुरू करण्यासंबंधी १५ मे रोजी फेरआढावा घेण्यात येणार आहे. फेरआढावा घेण्याआधी या काळात मार्केटच्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
एक आठवडा मार्केट बंद केल्यानंतर या दरम्यान कामगार, व्यापारी, ट्रान्सपोर्टर अशा 18 ते 20 हजार जणांचं स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. यात ज्यांना लक्षणे आढळतील त्यांना मार्केट मध्ये प्रवेश बंदी केली जाणार असून त्यांच्या कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली