ना. म. जोशी मार्ग मनपा शाळेची बाजी

दादर - शिवाजी पार्क मैदानात श्री उद्यानगणेश शालेय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. ना. म. जोशी मार्ग मनपा शाळा विरुद्ध नाबर गुरुजी विद्यालय यांच्यात सामना झाला. ना. म. जोशी मार्ग मनपा शाळेनं नाबर गुरुजी विद्यालयाचा 35-25 असा पराभव केला आणि श्री उद्यानगणेश शालेय मुलांच्या कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती आयोजित कबड्डी स्पर्धेत शारदाश्रम विद्यामंदिर मराठी शाळा, उत्कर्ष विद्यामंदीर, राजा शिवाजी विद्यालय संघांनी उपांत्यपूर्व फेरीत सामने जिंकले.

पुढील बातमी
इतर बातम्या