शिवाजी पार्क जिमखान्यात बॉलिंग मशीनचं उद्घाटन

  • सुकेश बोराळे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

शिवाजी पार्क - तुफान वेगानं बॅट्समनच्या दिशेनं येणारा बॉल. आणि त्याचा यशस्वीपणे सामना करणारा बॅट्समन. पण थांबा. हा बॉल कोणताही बॉलर टाकत नाहीये. तर ही आहे अत्याधुनिक बॉलिंग मशीन आणि हे मैदान आहे सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि सुनिल गावस्करसारख्या खेळाडूंना घडवणारं शिवाजी पार्क मैदान. नवोदित बॅट्समन्सना आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देण्यासाठी शिवाजी पार्क जिमखान्यात हे बॉलिंग मशीन बसवण्यात आलंय. शरद पवार इनडोअर क्रिकेट अकादमीचे चेअरमन विनोद देशपांडे यांच्या हस्ते या मशीनचं उद्घाटन करण्यात आलं. वेगवेगळ्या अशा 10 प्रकारच्या बॉलिंग स्टाईल, वेगावर या मशीनमधून बॉलिंग होऊ शकते. भारताकडून खेळणा-या अनेक दिग्गज खेळाडूंना या मैदानानं घडवलंय. पण या मशीनमुळे नवोदित खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून राहण्यासाठी सक्षम होतील हे नक्की.

पुढील बातमी
इतर बातम्या