सीसीअायचा प्रेझमन ठरला बिलियर्डस लीगचा 'चॅम्पियन'!

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रीडा

अचूक निर्धार अाणि विश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत सीसीअायच्या प्रेझमन टीमनं एमसीएफ टफ मेन संघाचा पाडाव करत सीसीअाय केकू निकोल्सन बीएसएएम बिलियर्डस लीग २०१८ चा चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. सीसीअाय प्रेझमन संघानं ६००-३३२ असा विजय मिळवत जेतेपद पटकावलं. सीसीअायचं हे गेल्या ५१ वर्षांतलं पहिलं जेतेपद ठरलं. त्याउलट अधिक सातत्यपूर्ण कामगिरी करत एमसीएफ संघानं चार वर्षात तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली होती.

सीसीअायची भन्नाट सुरुवात

हसन बदामी याने चंदू कन्सोदरिया स्पर्श फेरवानीचा पराभव करत सीसीअायला २०० गुण मिळवून दिले. त्यानंतर सीसीअायच्या स्पर्श फेरवानीला रोहन जाम्बुसरिया याच्याकडून पराभूत व्हावे लागले. तरीही सीसीअाय संघ ९१ गुणांनी अाघाडीवर होता. अखेर सीसीअायचा कर्णधार निशांत डोसा यानं मेहूल सुतारिया याचा पराभव करून उर्वरित गुण मिळवत सीसीअायच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

माझ्यासाठी, संपूर्ण संघासाठी अाणि सीसीअायसाठी हा अभिमानास्पद क्षण अाहे. सीसीअायचे दिवंगत अध्यक्ष केकू निकोल्सन यांना अाम्ही हे जेतेपद समर्पित करतो. त्यांच्या स्मृती अशाच ताजा राहाव्यात, यासाठी अाम्ही यापुढेही जेतेपदं पटकावण्याचा प्रयत्न करू.

- निशांत डोसा, विजेत्या संघाचा कर्णधार


हेही वाचा -

बिलियर्डस लीगच्या फायनलमध्ये सीसीअाय, एमसीएफ भिडणार

सीसीअाय केकू निकोल्सन बिलियर्डस लीग सोमवारपासून रंगणार

पुढील बातमी
इतर बातम्या