मुंबई - स्टॅण्डर्ड चार्टर्डच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मुंबई मॅरेथॉनला अवघे काही तास उरलेत. या मॅरेथॉनसाठी आता पश्चिम रेल्वेही सज्ज झाली आहे. 'परे'ने तर या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांसाठी विशेष गाड्या सोडल्या आहेत. 14 आणि 15 जानेवारी या दोन दिवशी 'परे'ने या स्पेशल रेल्वे सोडल्या आहेत.
मध्य रेल्वेनेही कल्याण आणि पनवेलवरून मॅरेथॉनसाठी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलाय. कल्याणहून पहाटे तीन वाजता ही विशेष ट्रेन निघेल, ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला पहाटे साडेचार वाजता पोहोचेल. तर पनवेलवरून पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही विशेष ट्रेन सुटेल ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला पहाटे साडेचार वाजता पोहोचेल.