नंदनवनमधील आग फटाक्यांमुळेच

  • भूषण शिंदे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

मुलुंड - कुरियर गोदामाला लागलेली आग ही फटाक्यांमुळेच लागल्याचं स्पष्ट झालंय. या आगीत लाकडी बाक, 6 संगणक आणि 2 वातानुकलीत यंत्रांचे नुकसान झाले आहे. अशी माहिती मुलुंड पोलीस ठाण्यातले अतिरिक्त निरीक्षक आरुस्कर यांनी दिली.

मुलुंडच्या नंदनवन इंडस्ट्रियल प्रिमायसेस इथे हे गोदाम असून मंगळवारी संध्याकाळी ही आग लागली होती. दिवाळीनिमित्त त्या गोदामातील सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी होती. त्यामुळं विजेचं स्विच बंदच होतं. ते गोदाम तळमजल्यावर असल्यानं फटाक्यांमुळेच आग लागली होती. आणि ते कुरियर गोदाम असल्याने तेथे कागदपत्रांच्या गठ्ठ्याचे ढीगच्या ढीग होते आणि यामुळेच ही आग त्वरित पसरली.

पुढील बातमी
इतर बातम्या