मुंबई स्नूकर लीगमध्ये अव्वल खेळाडूंचा जलवा

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रीडा

दोन वेळचा माजी अाशियाई चॅम्पियन यासिन मर्चंट यांच्यासह मुंबईतील सर्व अाघाडीचे स्नूकरपटू बीएसएएम-अाॅटर्स क्लब मुंबई स्नूकर लीग २०१८ मध्ये अापला जलवा दाखविण्यासाठी सज्ज झाले अाहेत. वांद्रे येथील अाॅटर्स क्लबवर या स्पर्धेचे पहिल्या फेरीचे होम अाणि अवे मॅचेस १ जुलैपर्यंत रंगणार अाहेत.

बक्षिसांचा वर्षाव

मुंबई स्नूकर लीगमधील विजेत्यांवर दोन लाख रुपयंच्या रोख रकमेच्या बक्षिसांचा वर्षाव केला जाणार अाहे. विजेता संघ ७५ हजार रुपयांचा रुपयांचा मानकरी ठरेल. उपविजेत्याला ४५ हजार तर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही संघांना २० हजार रुपये देऊन गौरवण्यात येतील. उपांत्यपूर्व फेरीत हरणाऱ्या संघांना १० हजार रुपये देण्यात येतील.

या खेळाडूंचा समावेश

यासिन मर्चंटसह या स्पर्धेत देवेंद्र जोशी, अशोक शांडिल्य, सिद्धार्थ पारिख, फैसल खान, सारंग श्राॅफ, इशप्रीत सिंग चढ्ढा यांसारखे अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार अाहे. 'बेस्ट अाॅफ ५' फ्रेमनुसार खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत ५२ टीम्स भाग घेणार अाहेत.


हेही वाचा -

स्पर्श फेरवानी ठरला महाराष्ट्राचा ज्युनियर बिलियर्डस चॅम्पियन

अादित्य मेहता, पंकज अडवाणी सीसीअाय स्नूकर स्पर्धेत झुंजणार

पुढील बातमी
इतर बातम्या