महाराष्ट्राच्या संघांना राष्ट्रीय रग्बीमध्ये कांस्यपदके

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रीडा

पावसाळा म्हणजे बैठी खेळांना सुगीचे दिवस. पण याच पावसाळ्यात धम्माल असते ती फुटबाॅल अाणि रग्बी खेळण्याची. नुकत्याच चंडीगढ इथं झालेल्या सिनियर राष्ट्रीय रग्बी सेव्हन्स अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष अाणि महिला संघांनी दमदार कामगिरी करत कांस्यपदकाला गवसणी घातली. मुंबईतील बाॅम्बे जिमखान्यावर सराव करणाऱ्या महाराष्ट्राच्या संघानं राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलं.

भारतीय रग्बी फुटबाॅल यूनियनच्या (अायअारएफयू) विद्यमानं अायोजित करण्यात अालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघानं तिसऱ्या-चौथ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात पश्चिम बंगालचा १७-५ असा धुव्वा उडवला. कोल्हापूरचा अक्षय व्हरांबळे हा स्पर्धेतील टाॅप स्कोरर ठरला. महिला संघाने बिहारचा १०-५ असा पराभव केला. साताऱ्याची रुतुजा किरदाट हिने सर्वाधिक गुण पटकावणाऱ्या महिलांमध्ये अव्वल तीन जणींमध्ये स्थान मिळवले.


हेही वाचा -

मुंबई क्रिकेटमध्येही सुरू होणार यो-यो टेस्ट?

मुंबईकर रुचीच्या हाती भारतीय रग्बी संघाची धुरा

पुढील बातमी
इतर बातम्या