जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 15 डिसेंबरपर्यंत अर्ज भरा

मुंबई - जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक आणि गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलंय. भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, दुसरा मजला, सायन-वांद्रे लिंक रोड, धारावी बस डेपोशेजारी, धारावी, सायन (प.), मुंबई - 400017 येथून हे अर्ज विनामूल्य प्राप्त करता येणार आहे.

अर्ज भरण्याची मुदत 15 डिसेंबरपर्यंत आहे. याशिवावाय अधिक माहितीसाठी मुंबई शहर (दूरध्वनी क्रमांक - 022- 65532373) येथे संपर्क साधता येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या