गुलाबी थंडीत मुंबईकरांची दौड...

  • अर्जुन कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

विलेपार्ले -  रविवारी सकाळी जुहू चौपाटीवर मुंबई धावताना बघायला मिळाली. त्याचं कारण होतं विवेकानंद यूथ कनेक्ट संस्थेच्या वतीने डॉ. राजेश सर्वज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेचं. या मॅरेथॉनमध्ये मुंबई विद्यापीठ,एसएनटीडीच्या विद्यार्थ्यांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला होता. 12, 5 आणि 2 किलोमीटरच्या या मॅरेथॉनमध्ये 12 हजार हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची 154 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 

पुढील बातमी
इतर बातम्या