सचिन तेंडुलकर आणि रोहीत शर्माने केलं कुलदीपचं कौतुक

मुंबई - धरमशाला येथे शनिवारी झालेल्या कसोटीतून पुन्हा एकदा नवीन नाव क्रिकेट रसिकांच्या तोंडावर आलं आहे ते म्हणजे कुलदीप यादवचं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवनं चांगली कामगिरी केली. 22 वर्षांच्या कुलदीप यादवने डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने सर्वांची मनं जिंकली. भारताच्या 82 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कुलदीप यादव हा पहिलाच चायनामन ठरला आहे.

कुलदीपने एकूण 4 विकेट घेत चांगली खेळी केली. अर्धशतक केलेल्या डेविड वॉर्नरला 56 धावांवर त्याने बाद केले. तसंच सर्व महत्त्वाचे फलंदाज कुलदीपने बाद केले. त्यानंतर मागील सामन्यात महत्त्वपूर्ण खेळी करणाऱ्या पीटर ह्याडस्कॉंब (8) आणि ग्लेन मॅक्सवेलला (8) त्याने स्वस्तात माघारी धाडले.


कुलदीपने केलेल्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक केलं होतंय. सचिन तेंडुलकरने कुलदीप यादवचं ट्विटरवरुन कौतुक केलंय. कुलदीपची वैविध्यपूर्ण गोलंदाजी बघून मी प्रभावित झालो आहे. तूझा खेळ बहरत राहो आणि या सामन्यातील विजयाचा तू शिल्पकारही ठरु शकतो, असे सचिननं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

तसंच भारताचा रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे तो या सामन्यात खेळू शकला नाही. त्याने देखील कुलदीपचं ट्विटरवरुन कौतुक केलंय.

कुलदीपने केलेल्या या चमकदार कामगिरीमुळे टीम इंडिया भविष्यात नक्कीच फायदा होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या