सात्विक साई राज आणि चिराग सुवर्णपदकाचे मानकरी

  • सुकेश बोराळे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

मुंबई - क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे सुरू असलेल्या टाटा खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विक साई राज या जोडीनं सुवर्णपदकावर नाव कोरलंय. अंतिम लढतीत चिराग आणि सात्विक साई राज यांनी अर्जुन एम. आर. आणि श्लोक रामचंद्रन जोडीवर 10-12 11-9 11-7 आणि 11-5 असा विजय मिळवला. तर मिश्र दुहेरीत विघ्नेश देवळेकर आणि कुहू गर्ग या जोडीनं रौप्य पदकाची कमाई केली. अंतिम लढतीत विघ्नेश आणि कुहू जोडीवर इंडोनेशियाच्या फचिझरा अभिमन्यू आणि बुंगा फितराणी ने 11-5 12-10 4-11 6-11 आणि 11-8 अशी मात करत विजय संपादन केला.

पुढील बातमी
इतर बातम्या