शालेय क्रीडा स्पर्धेचा उत्साह

  • प्रेसिता कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

प्रतीक्षानगर - कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यालयातील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झालीय. प्रतीक्षानगर इथल्या अशोक पिसाळ या क्रीडांगणात या स्पर्धेचं 7 डिसेंबरला आयोजन करण्यात आलं. यामध्ये लहान मुलांसाठी चमच्या गोटी, तर मोठ्यांसाठी खो-खो यांसारख्या खेळांचा समावेश आहे. "10 डिसेंबरपर्यंत ही क्रीडा स्पर्धा घेतली जाणार असून यामध्ये धावणी, गोळा फेक यांसारखे खेळ खेळले जातील आणि मुलांचा उत्साह यादरम्यान जास्त बघायला मिळेल असं शिक्षिका सुरेखा अवटी यांनी सांगितलं".

पुढील बातमी
इतर बातम्या