नरसिंगला प्रशिक्षण केंद्रासाठी जागा देणार

मुंबई - 'महाराष्ट्रात कुस्ती खेळाला विशेष महत्त्व आहे. कुस्ती खेळासाठी अधिक सुविधा आणि प्रोत्साहन देण्यासाठी सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू नरसिंग यादव यांच्या प्रशिक्षण केंद्राला जागा उपलब्ध करून देऊ', असे आश्वासन क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिले.

क्रीडा व युवक संचनालय आणि मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा परिषद व मुंबई उपनगर तालीम संघ आयोजित मुंबई विभागीय शालेय अंतिम कुस्ती स्पर्धा २०१६-१७ स्पर्धेला क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी भेट दिली. यावेळी तावडे म्हणाले, 'महाराष्ट्रातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जास्तीत जास्त कुस्तीपटू जाण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. कुस्ती खेळाला अधिक उत्तेजन देण्यासाठी कुस्ती प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत'.

पुढील बातमी
इतर बातम्या