विश्वविजेता प्रशांत मोरे

  • सुकेश बोराळे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

जोगेश्वरी - वयाच्या नवव्या वर्षापासून कॅरमची आवड असलेला मराठमोळा मुंबईकर प्रशांत मोरे. नुकत्याच इंग्लंडमध्ये पार पडलेल्या जागतिक स्तरावरच्या कॅरम स्पर्धेत विश्वविजेत्या कपवर प्रशांतनं आपलं नाव तर कोरलंच. शिवाय भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. प्रशांतच्या यशामागे त्याची आई संगीता मोरे यांचा मोठा हात आहे. दररोज त्याचा कॅरमच्या सराव घेणे. शाळेतून येण्याआधी कॅरमची व्यवस्था करून ठेवणे. याची काळजी नेहमी त्याची आई घेत असे.

कॅरम या खेळात प्रशांतनं खरंतर वडिलोपार्जित असा वारसा जपून ठेवलाय. प्रशांतचे गुरू दुसरे तिसरे कुणी नसून त्याचे वडीलच आहेत. कॅरमचे प्रशिक्षण त्याने आपल्या वडिलांकडूनचं घेतलंय. आज मुंबईतून विश्वविजेत्या पदाचा पहिला मान हा प्रशांतनं पटकावलाय त्यामुळं त्याचं वडील खूप आनंदी आहेत. प्रशांत आणि त्याचे वडील सूर्यकांत या दोघांनाही स्पोर्ट्स कोट्यातून नोकऱ्या मिळवल्या आहेत. त्यांचा या यशाला मुंबई लाइव्हचा सलाम...

पुढील बातमी
इतर बातम्या