दोन वेळा अाॅलिम्पिक पदकावर नाव कोरणारा कुस्तीपटू सुशील कुमारने अापल्या शिरपेचात अाज मानाचा अाणखी एक तुरा रोवला. अाॅलिम्पिक सहभागावरून बंदीची शिक्षा भोगल्यानंतर सुशील कुमारने राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदकालाच गवसणी घालत थाटात पुनरागमन केले. राष्ट्रकुलमध्ये तीन सुवर्णपदके पटकावणारा सुशील कुमार हा भारताचा पहिला कुस्तीपटू ठरला अाहे. सुशील कुमारच्या या कामगिरीमुळे भारताची सुवर्णपदकांची संख्या १४ वर पोहोचली अाहे.
या वर्षीच्या राष्ट्रकुलमध्ये सुशील कुमारची हुकूमत पाहायला मिळाली. सुशीलने एकही गुण न गमावता निर्विवाद वर्चस्व गाजवले. ७४ किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईल प्रकाराच्या अंतिम फेरीत सुशीलने दक्षिण अाफ्रिकेच्या योहानेस बोथा याच्यावर १०-० असे वर्चस्व गाजवले. तांत्रिकदृष्ट्या वरचढ ठरल्यामुळे ८० सेकंदात ही लढत थांबवण्यात अाली अाणि सुशील कुमारला विजेता घोषित करण्यात अाले.
पहिल्या दोन बाऊटमध्ये सुशीलकुमारने कॅनडाच्या जेव्हाॅन बॅल्फोर अाणि पाकिस्तानच्या मुहम्मद असाद बट यांना अनुक्रमे ११-० अाणि १०-० असे पराभूत केले होते. त्यानंतर उपांत्य फेरीत अाॅस्ट्रेलियाच्या कोनोर इव्हान्स याचा दोन मिनिटांतच फडशा पाडला होता. सुशील कुमारने २०१०च्या नवी दिल्लीतील राष्ट्रकुलमध्ये त्यानंतर २०१४ च्या ग्लास्गो राष्ट्रकुलमध्ये अाणि अाता गोल्डकोस्टमध्ये सुवर्णपदक पटकावण्याची किमया साधली.
हेही वाचा -
राष्ट्रकुलमध्ये कोल्हापूरचा दबदबा, राहुल अावारेला सुवर्ण तर तेजस्विनी सावंतला रौप्य