तळवलकर क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धा २८ नोव्हेंबरला, सुनीत जाधव करणार राज्याचं प्रतिनिधित्व

भारतातील शरीरसौष्ठव खेळातील सर्वात प्रतिष्ठेची 'तळवलकर क्लासिक स्पर्धा' बुधवारी २८ नोव्हेंबर रोजी अंधेरीतील सेलिब्रेशन क्लबमध्ये रंगणार आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण १३ लाख रुपयांची बक्षीसं देण्यात येणार अाहेत. या स्पर्धेत राज्याचं प्रतिनिधीत्वं मुंबईकर सुनित जाधव करणार आहे. 

२१ स्पर्धक सहभागी

भारतीय शरीरसौष्ठव क्षेत्रात व्यायाममहर्षी म्हणून ओळख असलेल्या मधुकर तळवलकर यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्तानं पहिल्यांदाच राज्यस्तरीय तळवलकर क्लासिक निमंत्रित शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत राज्यातील आघाडीचे १५ शरीरसौष्ठवपटू आणि ६ महिला स्पोर्ट्स फिजिक स्पर्धक सहभाग नोंदविणार आहेत. 

विजेत्याला ५ लाख बक्षीस 

या स्पर्धेसाठी एकूण १३ लाखांची बक्षीसं देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्याला ५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असून पुरुष गटातील पहिल्या व दुसऱ्या उपविजेत्याला अनुक्रमे २.५ आणि १.५ लाख रुपये देण्यात येणार आहे. इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन (आयबीबीएफ) आणि महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशन यांच्या मान्यतेनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्थानिक शरीरसौष्ठवपटूंना संधी

पहिल्यांदाच महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी तळवलकर क्लासिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्थानिक शरीरसौष्ठवपटूंना संधी मिळावी, यासाठी ही स्पर्धा महाराष्ट्रापुरतीच मर्यादित ठेवण्यात आली आहे. तसंच, प्रत्येकाला समान संधी मिळावी, यासाठी ही स्पर्धा दरवर्षी राज्य व अखिल भारतीय स्तरावर आयोजित करण्यात येते, असं तळवलकर बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेडचे संस्थापक मधुकर तळवलकर यांनी सांगितलं आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या