वेलावन सेंथीलकुमार अाणि उर्वशी जोशी यांनी अाॅटर्स क्लबच्या स्क्वाॅश कोर्टवर रंगलेल्या अाॅटर्स क्लब अोपन स्क्वाॅश स्पर्धेत शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत अनुक्रमे पुरुष अाणि महिला गटाचे विजेतेपद पटकावले. बिगरमानांकित अाकांक्षा साळुंखे हिने अंतिम फेरीत मजल मारताना धक्कादायक निकालांची नोंद केली होती. पण अव्वल मानांकित उर्वशी जोशीसमोर तिचा निभाव लागला नाही. उर्वशी जोशीने अंतिम फेरीत ११-६, ११-८, ११-८ असा सहज विजय मिळवत जेतेपद संपादन केले.
वेलावनची जेतेपदावर मोहोर
वेलावनने उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित अभिषेक अगरवालला हरवत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. पण अंतिम फेरीत त्याचा मुकाबला अव्वल मानांकित अभिषेक प्रधानशी होणार होता. चेन्नईच्या वेलावनने अभिषेक प्रधानचे अाव्हान ११-४, ११-७, १-११, ११-७ असे मोडीत काढत जेतेपद पटकावले. २० वर्षीय वेलावनला प्रत्येक गुणासाठी संघर्ष करावा लागला, पण काही ठिकाणी तो नशीबवान ठरल्याने त्याला सामन्यात २-० अशी अाघाडी घेता अाली. तिसऱ्या गेममध्ये जरी त्याने हार पत्करली तरी चौथ्या गेममध्ये जोमाने पुनरागमन करत जेतेपदावर नाव कोरले
मुलींमध्ये जनिया सिंगची बाजी
१९ वर्षांखालील गटात, जनिया सिंग हिने अंतिम लढतीत कोएल शंकरचा ११-४, ११-८, ११-४ असा सहज धुव्वा उडवत विजेतेपद अापल्या नावावर केले. उपांत्य फेरीत पाच गेमपर्यंत लढत दिल्यामुळे अंतिम सामन्यासाठी कोएल खूपच दमली होती. तिच्या या कमकुवत बाबीचा फायदा उठवत जनियाने अारामात विजेतेपद पटकावले. “कोएलविरुद्ध अंतिम लढतीत खेळण्यासाठी मी उत्सुक होते. अंतिम फेरीत खेळणे ही दुर्मिळ संधी असल्यामुळे मी त्यासाठी तयार होते. कोएल दमल्यामुळे तिच्याकडून फारसा प्रतिकार सहन करावा लागला नाही,” असे विजेतेपदानंतर जनियाने सांगितले.
हेही वाचा -
पृथ्वी शाॅची भारतीय कसोटी संघात निवड
कसोटीतही अोपनिंगला येण्यास रोहित शर्मा सज्ज