कोरोना व्हायरस महामारीनं जगभरात थैमान घातलं आहे. सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आढळत आहेत. मुंबई, पिंपरीत देखील रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या व्हायरसपासून वाचण्यासाठी आणि लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी टेक्नोलॉजीची मदत घेतली जात आहे.
आता ई-कॉमर्स साईट अॅमेझॉननं आपले वॉइस असिस्टेंट अॅलेक्सासाठी अपडेट जारी केलं आहे. या अपडेटमुळे आता युजर्स अॅलेक्साच्या माध्यमातून कोव्हिड-19 संदर्भातील माहिती जाणून घेऊ शकतील.
अॅलेक्साच्या माध्यमातून युजर्स कोरोना व्हायरसची लक्षण जाणून घेऊ शकतील. हे वॉइस असिस्टेंट इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत सपोर्ट करते. अॅमेझॉनचं म्हणणं आहे की, कंपनीनं आयसीएमआरची गाईडलाईन लक्षात घेऊन अॅलेक्साच्या अपडेटला कोरोना व्हायरसच्या लक्षणांसोबत तयार केलं आहे. अॅमेझॉन अॅलेक्सा आपल्या युजर्सला हात धुण्याचा देखील सल्ला देते.
नवीन अपडेट अंतर्गत अॅलेक्सा युजर्स कोरोनाग्रस्तांची संख्या आणि लॉकडाऊन संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती देईल. लॉकडाऊनमध्ये काय-काय करावं? याची माहिती अॅलेक्साद्वारे मिळेल.
दरम्यान सरकारनं देखील फेसबुकसोबत मिळून कोरोना हेल्पडेस्क चॅटबॉट लाँच केला आहे. या चॅटबॉटवर युजर्सला कोरोना व्हायरस संदर्भातील माहिती मिळेल.
हेही वाचा