डेंग्यू, मलेरियाविरोधात डिजिटल जनजागृती

मुंबईत डेंग्यू-मलेरिया आणि लेप्टोसारख्या आजारांची साथ पसरली आहे.  त्यामुळे या आजारांना दूर ठेवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं आव्हान मुंबई महानगर पालिकेसमोर आहे. त्यासाठी एफ दक्षिण विभागानं डिजिटल फलकाद्वारे आरोग्यविषयक जनजागृतीचा शुभारंभ केला. या फलकाचे उद्घाटन पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांच्या हस्ते करण्यात आले. परळमधल्या एफ दक्षिण विभागाच्या कार्यालयालगतच्या फुथपाथवरील भिंतीवर डिजिटल फलक लावण्यात आल्याची माहिती एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली. 

 

पुढील बातमी
इतर बातम्या