टिक-टॉक अ‍ॅपकडे युजर्सची पाठ, भारतीय अ‍ॅप 'मित्रों'ला पसंती

कोरोनाव्हायरसमुळे देशभरात हाहाकार माजवला आहे. चीनमधल्या वुहान इथून हा व्हायरस देशभर पसरला. यावरून आता सर्व देश चीनविरोधात एकवटलेले पाहायला मिळत आहेत. चीननं हा व्हायरस लॅबमध्ये तयार केल्याचा आरोप वारंवार अमेरिकेकडून केला जात आहे.

याचा परिणाम की चीनच्या कंपनीचे टीि-टॉक हे अ‍ॅपचे रेटिंग भारतात कमी झाले आहेत. चीन-भारतमध्ये चाललेल्या कॉल्डवॉरमुळे युजर्सनं खराब रिव्ह्यू देऊन त्याचे रेटिंग्स कमी केले होते. या अ‍ॅपवर बंदी घालण्याची देखील मागणी युजर्सकडून केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर आता मित्रों (Mitron) नावाचं एक भारतीय अ‍ॅप टिक-टॉकला टक्कर देत आहे.

मित्रों या अ‍ॅपला आता अधिक पसंती मिळत आहे. आतापर्यंत ५० लाखांपेक्षा अधिक वेळा हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आलं आहे. टीक-टॉक सारखेच फीचर्स मिळणाऱ्या या अ‍ॅपला आयआयटी रुडकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे.

आयआयटी रुडकीचा विद्यार्थी शिवांक अग्रवालनं हे अ‍ॅप तयार केलं आहे. या अ‍ॅपचा गुगल प्ले स्टोरवर टॉप फ्री चार्टच्या टॉप-10 समावेश झाला आहे. पेटीएमचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक यांच्याद्वारे करण्यात आलेल्या ट्विटमध्ये हे अ‍ॅप दुसऱ्या स्थानावर दिसत आहे. या अ‍ॅपमध्ये टीक-टॉक व्यतिरिक्त दुसरे कोणतेही खास फीचर्स नाहीत. मात्र आपल्या नाव आणि ब्रँडिंगमुळे ते लोकप्रिय होत आहे.

अ‍ॅप नवीन असून, यात अनेक बग्स आहेत. असं असलं तरी याला चांगले रिव्ह्यू मिळत आहेत. जवळपास ४.७ रेटिंग्स असणाऱ्या या अ‍ॅपमध्ये लॉग इन करताना समस्या येत असल्याचं अनेक युजर्सनी म्हटलं आहे. मात्र भारतीय अ‍ॅप असल्यानं याला बराच पाठिंबा मिळत आहे. ८ एमबीच्या या अ‍ॅपला ११ एप्रिल २०२० ला रिलीज करण्यात आलं होतं. सध्या केवळ गुगल प्लेवरच हे अ‍ॅप उपलब्ध आहे.


हेही वाचा

फेसबुक शॉप! आता फेसबुकवर थाटा दुकान

फेसबुकवर व्हिडीओ पाहताय? मग मोजावे लागू शकतात पैसे

पुढील बातमी
इतर बातम्या