खास क्रीडाप्रेमींसाठी रुटर

मुंबई - लाइव्ह सामन्याचा आनंद वाढवणारं रुटर नावाचं अॅप अॅण्ड्रॉइड आणि आयओएस मंचावर दाखल झालंय. या अॅपचं वैशिष्ट्य म्हणजे जगभरातल्या चाहत्यांना थरारक सामने पाहतानाच एकमेकांशी संवादही साधता येईल.

या अॅपचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लाइव्ह सामन्यांच्या निकालाचा अंदाज लावणारा गेम. त्यात सामना सुरू असताना तुम्ही सहभागी होऊ शकता आणि जवळपासच्या इतर चाहत्यांशी संवाद साधू शकता. या मंचाद्वारे क्रीडाप्रेमी खऱ्या तसंच आभासी जगाशी गेम्स आणि सोशल इंटरअॅक्शनद्वारे जोडले जाणारेत. रुटरच्या रिअल-टाइम एंगेजमेंट सुविधेमुळे थरारक सामन्याचा आनंद चाहत्यांना घेता येईल. तसंच क्रीडा संघ, क्लब्ज आणि खेळाडूंनाही चाहत्यांशी संवाद साधता येईल. सामना सुरू असताना लाइव्ह मॅच फोरम तयार करता येईल, सामनापूर्व प्रश्नमंजुषा सोडवून बक्षिसं मिळवता येतील. जागतिक क्रीडा चाहत्यांसाठी भारतीय अॅप म्हणून तयार करण्यात आलेल्या रुटरचा भर जगातला सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल आणि भारतातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ, अर्थात क्रिकेटवर असेल. सर्व युरोपियन फुटबॉल लीग्ज तसंच इंडियन सुपर लीगही (आयएसएल) रुटर कव्हर करेल. इतकंच नव्हे, तर ग्रँडस्लॅम आणि एटीपी टेनिस सामन्यांसाठीही तुम्ही रुटर वापरू शकाल.

पुढील बातमी
इतर बातम्या