व्हॉट्स अॅप इमोजीला स्टिकरचा पर्याय!

टेक्स्ट मेसेजमध्ये सर्वाधिक वापर हाेतो तो इमोजीचा. इमोजीमुळे एखादी भावना सहज व्यक्त करता येते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीपर्यंत आपल्या भावना थेट पोहोचतात, अशी तरूण पिढीची भावना असल्याने हे फिचर झटक्यात लोकप्रिय झालं. हेच लक्षात घेत व्हॉट्सअॅपने लवकरच इमोजीला पर्याय म्हणून नवीन फिचर आणण्याचं ठरवलं आहे. 

इमोजीला नवा पर्याय

इमोजीला पर्याय म्हणून व्हॉट्स अॅप स्टिकर हे नवं फिचर आणत आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या एफ ८ परिषदेत व्हॉट्स अॅपनं हे फिचर येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार लवकरच युजर्ससाठी स्टिकरचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या व्हॉट्स अॅप अॅनड्रॉईड बेटा वर्जन 2.18.218. वर हे फिचर उपलब्ध आहे.

कुठले फिचर्स असतील

नवीन फिचर पॅकमध्ये ४ प्रकारचे स्टिकर्स असणार आहेत. लोल, लव्ह, सॅड आणि वाव असे चार प्रकारचे स्टिकर्स असतील. हे पॅक युजर्सना डाऊनलोड करता येतील. डाऊनलोड केल्यानंतर युजर्स हे स्टिकर चॅटमध्ये वापरू शकतील.  

इमोजीला पर्याय म्हणून स्टिकर वापरता येतील अशी घोषणा एफ 8 परिषदेत करण्यात आली होती. पण यासंदर्भात व्हॉट्स अॅपनं अजूनपर्यंत कुठलीच अधिकृत घोषणा केली नाही.


हेही वाचा-

आता गुगल देणार भारतातील पूरस्थितीची माहिती

हे आहेत व्हॉट्सअॅपचे ५ नवीन फिचर्स


पुढील बातमी
इतर बातम्या