आपल्यापैकी अनेक जण व्हॉट्स अॅपचा वापर करतात. व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांसाठी काही ना काही नवीन फिचर्स लाँच केले जातातच. वर्षभरापूर्वी व्हॉट्स अॅपनं स्टिकर्स लाँच केले होते. यावेळी व्हॉट्स अॅप अॅनिमेटेड स्टिकर्स आणण्याच्या तयारीत आहेत. अॅनिमेटेड स्टिकर्स हे फेसबुकवर आपण पाहिले असतीलच. आता हे स्टिकर्स तुम्हाला व्हॉट्स अॅपवर देखील पाहता येणार आहेत.
व्हॉटसअॅपच्या सर्व मोबाइल व्हर्जन्स आणि वेब व्हर्जन्सवर हे फिचर असणार आहे. या फिचरचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पण अॅनिमेटेड स्टिकर्स बघू शकता. म्हणजेच अॅनिमेटेड स्टिकर्स बघण्यासाठी तुम्हाला व्हॉटसअॅप उघडण्याची गरज नाही. व्हॉटसअॅप सध्या या फिचरची टेस्टिंग करत आहे. लवकरच आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये अॅनिमेटेड स्टिकर्स असतील.
यासोबतच व्हॉटस अॅपचं नाईट मोड फिचर पण चर्चेत आहे. अॅड्रॉइड क्यु सिस्टिममध्ये नाईट मोड आलेला आहे. या फिचरचं पहिलं नाव हे डार्क मोड असं ठेवण्यात आलं होतं. पण हे नाव बदलून नाईट मोड असं देण्यात आलं आहे. नाईट मोड या फिचरमध्ये व्हॉट्स अॅप स्क्रिन ग्रीन एेवजी ब्लॅक दिसणार. त्यावरील अक्षरं ही पांढरी दिसतील.
व्हॉट्स अॅपनं अजून हे दोन फिचर लाँच केले नाहीत. या फिचर्सची तपासणी झाली की तुम्ही त्याचा वापर करायला मोकळे. लवकरच व्हॉट्स अॅप लवकरच हे फिचर लाँच करण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा