व्हॉट्सअॅपचं नवीन फिचर

मुंबई - व्हॉट्सअॅपने आतापर्यंत विविध फिचर्स देऊन यूजर्सना भरपूर खुश केल आहेच. मात्र आता व्हॉट्सअॅपचं अजून एक नव फिचर व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी व्हॉट्सअॅपने उपलब्ध करून दिलं आहे. अँड्रॉईड आणि विंडोज फोनवर व्हॉट्सअॅपचे हे नवं फिचर अपडेट झाले आहे. हे नवे फिचर वापरून यूजर्स आपले स्टेटस क्रिएट करू शकतात. यावर ते फोटो, व्हिडिओ, जीआयएफ फाईल्स शेअर करू शकतात. त्यावर कॅप्शनही लिहू शकतात. विशेष म्हणजे 24 तासांनंतर हे स्टेटस् निघून जाईल. त्यामुळे 24 तासांनंतर युजर्सना पुन्हा एकदा स्टेटस् अपडेट करावे लागेल. जर एखाद्याचे स्टेटस् आवडले तर त्या व्यक्तिला मेसेजही करता येणार आहे. या अपडेटमुळे पूर्वीसारखे आता टेक्सच्या स्वरुपात स्टेटस् ठेवता येणार नाही, त्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या