'असं' करा KBC 12 चे ऑनलाइन रजिस्ट्रेशन

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने 'कौन बनेगा करोडपती' (KBC) च्या १२व्या सीझनची घोषणा केली आहे. २० वर्षांपूर्वी सुरू झालेला KBC हा बहुधा भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध शो आहे.  खास गोष्ट म्हणजे यंदाच्या १२व्या सीझनची रजिस्ट्रेशन प्रक्रिया ९ मेपासून सूरु झाली आहे.

केबीसीच्या इतिहासात प्रथमच शोच्या रजिस्ट्रेशनपासून ते स्पर्धकांची निवड प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. स्मार्टफोन्सचा सर्वदूर झालेला प्रसार आणि सर्वसामान्य जागरूकता यामुळे सर्व कान्या-कोपर्‍यांपर्यंत KBC चा प्रचार होऊन पूर्वीपेक्षाही अनेक पटींनी जास्त मोठा प्रतिसाद मिळण्याची आशा आहे.

तुम्हाला देखील या शोसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे. मग खाली दिलेल्या टिप्स टप्याटप्यानुसार फॉलो करा.  

  • टप्पा १ : नोंदणी

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन KBC च्या 12व्या सीझनची नावनोंदणी ९ मे पासून सुरू करून २२ मे पर्यंत चालू ठेवेल. अमिताभ बच्चन दररोज रात्री ९ वाजता सोनी टीव्हीवर एक नवीन प्रश्न विचारतील. तुम्ही या प्रश्नांची उत्तरे SMS किंवा सोनीलिवच्या माध्यमातून देऊ शकाल.

  • टप्पा २ : स्क्रीनिंग

नोंदणी प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍या लोकांमधून, काही पूर्व-निर्धारित नोंदणी निकषांच्या आधारे यादृच्छिक (रॅन्डम) रित्या काही प्रतिस्पर्धी निवडण्यात येतील, ज्यांचा पुढील मूल्यमापनासाठी टेलीफोनवरून संपर्क साधण्यात येईल.

  • टप्पा ३ : ऑनलाइन ऑडिशन

KBC च्या इतिहासात पहिल्यांदाच, सामान्य ज्ञान चाचणी आणि व्हिडिओ सबमिशनसह सोनीलिवच्या माध्यमातून ऑडिशन्स घेण्यात येतील. हे एक खूप कठीण काम वाटत असले, तरी एका साध्या ट्यूटोरियलच्या माध्यमातून त्याचे सर्व तपशील समजावून सांगण्यात येतील.

  • टप्पा ४ : व्यक्तीगत मुलाखत

ऑडिशनमधून निवडलेल्या लोकांची शेवटच्या फेरीत व्यक्तीगत मुलाखत घेण्यात येईल. जी व्हिडिओ कॉलमार्फत योजण्यात येईल. एका स्वतंत्र ऑडिट कंपनीद्वारे या संपूर्ण निवड प्रक्रियेची तपासणी करण्यात येईल.

वाहिनीनं अलीकडेच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर या शो संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे . या व्हिडिओत अमिताभ बच्चन KBC मध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍या लोकांना आवाहन करत आहेत. ते म्हणत आहेत की, हर चीज को ब्रेक लग सकता है... सपनों को नहीं... पहिल्यांदाच बिग बींनी KBC साठी आपल्या घरात राहूनच चित्रीकरण केलं आहे.

नितेश तिवारी यांनी नोंदणीच्या प्रोमोचं दिग्दर्शन केलं आहे. हीच यंदाच्या शोची टॅगलाइन आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या निराशाजनक वातावरणात चैतन्य निर्माण करणारी अशी ही टॅगलाइन आहे.


हेही वाचा

'ते' मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांना सायबर पोलिसांचे आवाहन, सेलिब्रिटींचीही साथ

जुलैपासून चित्रकरणाला होणार सुरूवात?

पुढील बातमी
इतर बातम्या