सीएसटी - आज्ञाकारी नागरिक-सुरक्षित नागरिक! जिन्दगी से करो प्यार हेल्मेट को स्वीकार करो, रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा करा वापर, रस्त्यावरून वाहने चालवताना मोबाईल संभाषण
या उपक्रमात आझाद मैदान वाहतूक पोलीसही सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी हातात फलक घेऊन या उपक्रमाला सहकार्य केले. यामध्ये वाहतूक वरिष्ठ पोलीस अधिकारी नम्रता लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक रमेश आव्हाड आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहनचालकांना सुरक्षिततेबाबत संदेश देण्यासाठी अनेक उपक्रम, योजना, मोहिमा आणि जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत असतात. या उपक्रमाला आपलाही हातभार लागावा आणि एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचावेत यासाठी सेफ कीड फाऊंडेशन आणि फिडेक्स कर्मचारी यांनी संयुक्तरित्या प्रथमच पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवला असून, मुंबई, मुंबई उपनगर भागातील गर्दीच्या ठिकाणी आठवड्यातून एकदा हे सादरीकरण करण्यात येईल असे फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.