जीवघेणं 'ठाणे', साडेचार महिन्यांत ११२ बळी

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • परिवहन

सर्वाधिक गर्दीचं स्थानक असलेलं मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे स्थानक रेल्वे प्रवाशांसाठी जीवघेणं ठरत आहे. या स्थानकाच्या हद्दीत रेल्वे अपघातात बळी जाण्याचं प्रमाणही वाढत असल्याची धक्कादायक आकडेवारी पुढं आली आहे.

कालावधी कुठला?

मागील साडेचार महिन्यांमध्ये ठाणे रेल्वे स्थानकात अपघाती मृत्यूने शंभरी ओलांडल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. १ जानेवारी २०१८ ते १२ मे २०१८ या साडेचार महिन्यांमध्ये ११२ जणांचा ठाणे रेल्वे स्थानकात अपघाती मृत्यू झाला आहे.

कारण काय?

गर्दीमुळे फूटओव्हर ब्रिजचा वापर करण्याऐवजी थेट रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करणे, लोकलच्या दरवाजात उभं राहणे, खांबाला धडक लागून खाली पडणं अशा विविध कारणांचा यामध्ये समावेश आहे.

दुसऱ्या, तिसऱ्या स्थानी कोण?

  • ठाणे स्थानकापाठोपाठ दुसऱ्या स्थानावर मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण रेल्वे स्थानक असून इथं झालेल्या अपघातात एकूण ११० प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत.
  • तिसऱ्या क्रमांकावर बोरीवली स्थानक आहे. या स्थानकात मागील साडेचार महिन्यांमध्ये १०७ प्रवाशांनी जीव गमावला आहे.
  • या क्रमवारीत कुर्ला स्थानक चौथ्या क्रमांकावर अाहे. या रेल्वे स्थानकात ८० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

तर, मुंबई विभागातील मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या हद्दीत या कालावधीत ७९७ रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा-

लोकलच्या धडकेने एकाच कुटुंबातील ४ तरूणांचा मृत्यू

नेरुळ-उरण पहिल्या पाच स्थानकांपर्यत लोकल सेवा?


पुढील बातमी
इतर बातम्या