मध्य रेल्वेवर १४ तासांचा जम्बो मेगाब्लॉक

(Representational Image)
(Representational Image)

मध्य रेल्वेवर येत्या शनिवारी आणि रविवारी (२२ -२३ जानेवारी) पुन्हा एकदा चौदा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक ठाणे आणि दिवा दरम्यान डाऊन जलद मार्गिकेवर असणार आहे.

डाऊन फास्ट मार्गिकेवर मेगा ब्लॉकची सुरुवात शनिवारी मध्यरात्रीनंतर ०१ वाजून २० मिनिटांनी होईल, तर रविवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटंपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.

मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या अप फास्ट मार्गीकेवर दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल आणि २ वाजून ३० मिनिटांनी संपेल. या मेगा ब्लॉकच्या दरम्यान अप आणि डाऊन दिशेला धीम्यामार्गीकेवर लोकल धावतील.

शनिवारी या ब्लॉगच्या आधी दादर इथून सुटणाऱ्या जलद लोकल आणि एक्सप्रेस ११ वाजून ४० मिनिटांपासून ते रात्री २ वाजेपर्यंत माटुंगा आणि कल्याण स्थानकाच्या दरम्यान डाऊन स्लो लाईन वरून धावतील. या काळात काही एक्स्प्रेस ठाणे स्टेशनवर थांबणार नाहीत.

तर ब्लॉक सुरू झाल्यानंतर दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सीएसएमटी इथून सुटणाऱ्या एक्सप्रेस, तसंच फास्ट लोकल या मुलुंड आणि कल्याणच्या दरम्यान डाऊन स्लो लाईनवर डायव्हर्ट करण्यात येतील. असं असलं तरी मेगा ब्लॉकच्या दरम्यान ठाणे स्टेशनच्या दोन नंबर प्लॅटफॉर्मवर एक्स्प्रेस आणि मेल गाड्या थांबणार नाहीत असं मध्य रेल्वेनं सांगितलं आहे.

२२-२३ जानेवारीला होणारे बदल

  • १७६१८ नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस
  • 11030 कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस
  • १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस
  • 23 जानेवारीपासून सुरू होणारा एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास रद्द
  • 22105 / 22106 मुंबई-पुणे-मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस
  • 22119 / 22120 मुंबई-करमाळी-मुंबई तेजस एक्सप्रेस
  • 11007 / 11008 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस
  • १७६१७ मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस
  • १२०७१ / १२०७२ मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
  • 11029 मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
  • १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस
  • पनवेल येथे एक्स्प्रेस गाड्यांचा अल्प कालावधी
  • 16346 तिरुवनंतपुरम-LTT नेत्रावती एक्सप्रेस JCO 21 जानेवारी
  • १२०५२ मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस JCO २२ जानेवारी
  • 10112 मडगाव-मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस JCO 22 जानेवारी
  • पनवेलहून एक्सप्रेस गाड्यांची शॉर्ट ओरिजिनेशन
  • १६३४५ LTT-तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस JCO 23 जानेवारी
  • १२०५१ मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस JCO २३ जानेवारी
  • 10103 मुंबई-मडगाव मांडवी एक्सप्रेस JCO 23 जानेवारी

हेही वाचा

४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान मध्य रेल्वेवर ७२ तासांचा मेगाब्लॉक

पुढील बातमी
इतर बातम्या