जेट एअरवेजचे १५८ प्रवासी मुंबई विमानतळावर अडकले

  • मुंबई लाइव्ह टीम & सोनाली मदने
  • परिवहन

जेट एअरवेजच्या गोंधळाचा फटका रविवारी सकाळी जेट एअरवेजने मुंबई-अहमदाबादचा प्रवास करणाऱ्या तब्बल १५८ प्रवाशांना बसला आहे. रविवारी अहमदाबादला पोहचण्याएेवजी या १५८ प्रवाशांना मुंबई विमानतळावरच अडकडून राहवं लागलं आहे. त्यामुळे या प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वेळ निघून गेली तरी

रविवारी सकाळी जेट एअरवेजचं ९-२३-१४१४ मुंबई-अहमदाबाद विमान उड्डाण घेणार होतं. या विमानानं प्रवास करणारे प्रवासी विमानात प्रवेश करण्याच्या प्रतिक्षेत होते, पण विमान उड्डाणाची वेळ निघून गेली, तरी प्रवेश न मिळाल्यानं प्रवाशांची चिंता वाढली. त्यांनी जेट एअरवेजकडे विचारणा केली असता त्यांना अहमदाबाद विमानतळ बंद असल्याचं सांगण्यात आलं. 

प्रवाशांना राग अनावर

अहमदाबाद विमानतळावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत दुरूस्तीचं काम सुरू असल्यानं विमानाचं उड्डाण उशिरा होणार असल्याचं प्रवाशांना राग अनावर झाला.

याचा फटका प्रवाशांना 

अहमदाबाद विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद विमानतळावर रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत दुरूस्तीचं काम होणार असल्याचं याआधीच जेट एअरवेजला कळवण्यात आलं होतं. तरीही जेट एअरवेजनं विमानाच्या उड्डाणाची वेळ बदलल्याची सूचना प्रवाशांना दिली नाही, वा उड्डाण रद्द केलं नाही. त्यामुळं १५८ प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला असून हे प्रवासी अजूनही मुंबई विमानतळावरच अडकून आहेत. आता हे विमान अहमदाबादला कधी पोहचणार? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या