या आठवड्यात 'परे'वर धावणार एसी लोकल

मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या गारेगार प्रवासाच्या स्वप्नाचा बेरंग करत पश्चिम रेल्वेवर चाचणी घेण्यासाठी एसी लोकल सज्ज झाली आहे. या आठवड्यापासून एसी लोकलच्या चाचण्यांचे नियोजन करण्यात आले असून, यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्याची माहिती पश्चिम रेल्वचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

एसी लोकलच्या चाचण्यांबाबत बीएचईएल (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड) आणि आरडीएसओच्या (रिसर्च डिजाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) अधिकाऱ्यांशी चर्चा झाली अाहे. तीन ते चार महिने एसी लोकलच्या विविध चाचण्या होतील आणि 'परे'च्या रेल्वेमार्गांवरील विविध भागांमध्ये चाचण्यांदरम्यान गाडीच्या विविध बाबींची तपासणी होईल, असे रविंद्र भाकर यांनी सांगितले.

गेल्या वर्षी 5 एप्रिल रोजी चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीतून मुंबईत दाखल झालेल्या एसी लोकलची चाचणी यापूर्वी मध्य रेल्वेवर यशस्वीपणे पार पडली होती. परंतु, एसी लोकलची उंची मध्य रेल्वेवरील इतर लोकल ट्रेन्सच्या उंचीपेक्षा जास्त असल्याने ती आता पश्चिम रेल्वेवर धावणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या