बेस्ट बसेसवर GPS लावल्यानं वेगावर येणार मर्यादा, उल्लंघन करणार्‍यांना फटकारणार

मुंबईच्या बेस्ट (BEST) बसेसना एखाद्या ठिकाणी वेळेत पोहोचणं सर्वात मोठं आव्हानं आहे. शहरात चालू असलेल्या बांधकामामुळे किंवा पायाभूत सुविधांच्या कामांमुळे ट्राफिकच्या समस्येचा सामना करावा लागतो. पण आता नवीन आव्हानाचा सामना बेस्ट चालकांना करावा लागत आहे.

आता प्रत्येक बसमध्ये एम्बेड केलेल्या जीपीएस डिव्हाइसच्या मदतीनं बेस्ट बसेसचे नियंत्रण केलं जात आहे. कंट्रोल रूमसह त्यांची गती आणि स्थानाचं निरीक्षण केलं जातं.

बेस्ट अधिकाऱ्यांनी असं म्हटलं आहे की, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं आहे. तथापि, बेस्ट चालक आणि कर्मचाऱ्यांचा असा विश्वास आहे की, हे केवळ अडथळा असल्याचंच सिद्ध होते.

महामार्गाचा वापर करून मुंबईहून नवी मुंबईकडे जाणाऱ्या बसेससाठी अधिकाऱ्यांनी ताशी किलोमीटर प्रति तास मर्यादा मर्यादित केली आहे. वडाळा इथल्या मध्यवर्ती बस नियंत्रण कक्षानं डॅशबोर्डवरील सर्व बसचा मागोवा घेतला आहे.

नव्यानं अंमलात आणलेल्या एकात्मिक परिवहन व्यवस्थापन प्रणालीचा हा एक भाग आहे. शिवाय, वेग मर्यादेपेक्षा जास्त जाणाऱ्या वाहनचालकांना फटकारलं जातं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

बेस्ट चालकांचं म्हणणं आहे की, वेळापत्रकात चिकटून राहण्याच्या दृष्टीने त्यांच्या मार्गावर आणखी एक अडचण निर्माण झाली आहे.

बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य म्हणाले, “बस चालवण्याचं प्रत्येक बस चालकाचं स्वतःचं गणित असतं. या पद्धतीनं तो ट्राफिकमध्ये वाया गेलेला वेळ तो भरून काढेल आणि दिलेल्या वेळेत पोडोचेल. पण अशा निर्बंधांमुळे त्यांचे स्वातंत्र्य मर्यादित होते.”

मिड-डेशी बोलणार्‍या एका बस चालकानं सांगितलं की, उपनगरे तसंच शहराच्या बहुतांश भागांवर वेग २० किमी प्रतितास इतका झाला आहे. ड्रायव्हरनं हेही स्पष्ट केलं की, ५० किमी प्रतितास अंतर जरी झाले तरी अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्याची त्यांना भीती आहे.


हेही वाचा

मध्य रेल्वेची ऑटोमोबाईल उत्पादनांची विक्रमी वाहतूक

एसटी 'सीएनजी' इंधनावर चालविण्याचा निर्णय

पुढील बातमी
इतर बातम्या