'बेस्ट'! प्रवाशांसाठी नवी सुविधा, आता स्वमर्जीने निवडता येणार बसफेरी

(Representational Image)
(Representational Image)

बेस्ट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी बेस्ट प्रशासन नेहमीच प्रयत्न करत असते. अशातच आणखी एक सुविधा बेस्ट प्रवाशांसाठी सुरू करत आहे. त्यानुसार, बेस्ट प्रवाशांना आता आवडत्या बस फेरीचीही निवड करता येणार आहे.

बेस्ट उपक्रमाच्या प्रवासाकरता बस पास व दैनंदिन तिकिटामध्ये बचत करणारी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार ७२ प्रकारच्या विविध नव्या योजनांमधून प्रवासी आपल्याला हवी असलेल्या फेरीची निवड करू शकता येणार आहे.

बेस्ट उपक्रम प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एकात्मिक तिकीट प्रणाली)आणि मोबाईल अ‍ॅप सुविधा आणत आहे. कॉमन मोबिलिटी कार्ड घेतानाच प्रवाशांना एक मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. कार्डला मोबाईल अ‍ॅपची जोड दिली जाईल आणि त्याद्वारेच या योजनेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे.

विना वातानुकूलित आणि वातानुकूलित बस प्रवाशांना ही सुविधा मिळेल. या योजनेनुसार २ आठवडे, ४ आठवडे आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फेऱ्या, दिवस यावर आधारित निवडक भाडे टप्प्यात प्रवास करता येणार आहे.

एका दिवसाच्या योजनेपासून जास्तीत जास्त ८४ दिवसांपर्यंतच्या प्रवास योजनेचा यात समावेश आहे. विनावातानुकूलित बस सेवेत १४ दिवसांत ५० फेऱ्यांसाठी १९९ रुपये तिकीट दर आकारण्यात येईल. तर २८ दिवसांमागे १०० फेऱ्यांसाठी २४९ रुपये आणि १५० फेऱ्यांसाठी २९९ रुपये दर असतील. तर एका दिवसांत दोन फेऱ्यांसाठी नऊ रुपये आणि एका दिवसांत चार फेऱ्यांसाठी १४ रुपये तिकीट असेल.

पुढील बातमी
इतर बातम्या