विविध बॅंकांमधील मुदत ठेवी मोडून महापालिकेची बेस्टला मदत

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक तोट्यातून सावरण्यासाठी महापालिकेनं तयारी दर्शवली. मात्र, सध्यस्थितीत अनेकांना आर्थिक मंदीचा सामना करवा लागतो आहे. अशातच आता आर्थिक मंदीचा फटका पालिकेच्या तिजोरीलाही बसत आहे. त्यामुळं भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु, अस असतानाही विविध बँकांतील मुदत ठेवी तोडून बेस्ट उपक्रमाला सुमारे ४७८ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे.  

४७८ कोटीचं अनुदान

महापालिकेकडून बेस्ट उपक्रमाला अनुदान व कर्जस्वरूपात आतापर्यंत सुमारे १७०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता आणखी ४७८ कोटी रुपयांचं अनुदान देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आणला होता. मात्र, यासाठी महापालिकेने विविध बँकांतील आपल्या मुदत ठेवींपैकी काही ठेवी मोडून ही रक्कम उभी केली आहे.

विरोधी पक्षांची नाराजी

महापालिकेनं विविध बँकांतील आपल्या मुदत ठेवी मोडल्यानं विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त करीत महापालिकेच्या आर्थिक स्थितीला उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्याकडं लक्ष वेधलं आहेबेस्ट उपक्रमाला विविध बँकांमधील कर्ज फेडण्यासाठी महापालिकेने ११३६ कोटी रुपये दिले होते. मात्र, यापैकी ५५० कोटी रुपयेच बँकेत भरण्यात आले. उर्वरित ५५० कोटी कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी आणि ठेकेदारांचे पैसे देण्यासाठी वापरण्यात आले, याकडं विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी लक्ष वेधलं आहे.


हेही वाचा -

आरेतील जंगल वाचविण्यासाठी चिपको चळवळ सुरू करणार – आप

केंद्रीय निवडणूक आयुक्त मुंबईत, विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा


पुढील बातमी
इतर बातम्या