सावधान ! पुढे धोका आहे

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

घाटकोपर - शाळा, कॉलेज आणि कामाच्या ठिकाणी लवकर पोहचण्याच्या घाईत अनेकदा प्रवासी रेल्वे रुळ ओलांडताना दिसतात. अशा प्रवाशांना समज देण्यासाठी सोमवारी घाटकोपरमध्ये आरपीएफच्या वतीने जनजागृती अभियान राबवण्यात आले. यावेळी आरपीएफकडून मोनिका मोरेला विशेष निमंत्रण देण्यात आले. या अभियानांतर्गत प्रवाशांना 'फूट ओव्हर ब्रिज, एस्कलेटर किंवा सब-वेचा उपयोग करा' असा संदेश मोनिकाने दिला. तसेच अनेक प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडताना पकडून पुन्हा रेल्वे रुळ ओलांडणार नाही अशी शपथ देखील त्यांना देण्यात आली.

पुढील बातमी
इतर बातम्या