मध्य रेल्वेच्या दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान आजपासून ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावरील दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान अप-डाऊन धीम्या आणि जलद मार्गांवर १३ ते १८ डिसेंबर दरम्यान मध्य रेल्वेतर्फे रात्रीच्या वेळी ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे ब्लॉकच्या काळात धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते भायखळा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसंच लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत.

पहिला ब्लॉक

पहिला ब्लॉक १३ ते १४ डिसेंबर मध्यरात्री १२.५० ते पहाटे ५ वाजेपर्यंत असून अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे.

ब्लॉकदरम्यान, गुरुवारी रात्री सीएसएमटी येथून ११.४८ मिनिटांची कुर्ला लोकल आणि शुक्रवारी रात्री १२.३१ मिनिटांची कुर्ला लोकल रद्द होणार.

दुसरा ब्लॉक

दुसरा ब्लॉक १४ ते १५ डिसेंबर मध्यरात्री १२.०० ते पहाटे ५ वाजेपर्यंत असून अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे.

ब्लॉकदरम्यान, शुक्रवारी रात्री सीएसएमटी येथून ११.४८ मिनिटांची कुर्ला लोकल आणि शुक्रवारी रात्री १२. ३१ मिनिटांची कुर्ला लोकल रद्द होणार. रविवारी कुर्ला स्थानकाहून सीएसएमटीसाठी रवाना होणारी ४.५१ आणि ५.५४ रद्द होणार.

तिसरा ब्लॉक

तिसरा ब्लॉक १५ ते १६ डिसेंबर मध्यरात्री ११.१५ ते पहाटे ६ वाजेपर्यंत आणि दादर टर्मिनसवर मध्यरात्री १२.१५ ते ४.४५ वाजेपर्यंत ब्लॉक असून अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे.

ब्लॉकदरम्यान, शनिवारी रात्री ११.०० ते १२.३० या वेळेत डाऊन मेल-एक्स्प्रेस फलाट क्रमांक ४ वरून रवाना होतील. तसंच, भुसावळ-सीएसएमटी-भुसावळ आणि पुणे-सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द होणार.

चौथा ब्लॉक

चौथा ब्लॉक १६ ते १७ डिसेंबर मध्यरात्री १.१५ ते पहाटे ६ वाजेपर्यंत आणि दादर टर्मिनसवर मध्यरात्री १२.१५ ते ४.४५ वाजेपर्यंत असून अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे.

ब्लॉकदरम्यान, शनिवारी रात्री ११.०० ते १२.३० या वेळेत डाऊन मेल-एक्स्प्रेस फलाट क्रमांक ४ वरून रवाना होतील. कसारा-कर्जत अप जलद लोकल मुलुंड ते परळ स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

पाचवा ब्लॉक

पाचवा ब्लॉक १७ ते १८ डिसेंबर मध्यरात्री १२.४५ ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत दादर टर्मिनसवर आणि अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे.

ब्लॉकदरम्यान, सोमवारी रात्री कसारा-कर्जत अप जलद लोकल मुलुंड ते परळ स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉक काळात सोमवारी सीएसएमटीहून ठाण्याकडे जाणाऱ्या आणि मंगळवारी ठाणे-कुर्ला येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत.


हेही वाचा-

सज्ज व्हा! मुंबई-नाशिक लोकल प्रवासासाठी, चाचणी सुरू

'बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देणार, पण तारीख नाही सांगणार'


पुढील बातमी
इतर बातम्या