मध्य रेल्वेचा फुकट्यांना दणका, १३൦ कोटींचा दंड वसूल

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

मध्य रेल्वेने 'विनातिकीट आणि बेकायदेशीर सामान वाहतूक' ही मोहीम राबवत फुकट्यांना चांगलाच दणका दिला आहे. एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १३० कोटी ४४ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर जानेवारी २०१८ मध्ये फुकट्या प्रवाशांविरोधात २.१६ लाख गुन्ह्यांची नोंद केली असून ९ कोटी ३५ लाखाचा दंड वसूल केला.

इतक्या प्रवाशांना दणका?

मध्य रेल्वेने गेल्यावर्षी २०१७ मध्ये १.९४ लाख गुन्ह्यांची नोंद केली. तर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ८ कोटी ३५ लाखांचा दंड वसूल केला होता. दरम्यान, यावर्षी ११.३२ टक्क्यांनी रकमेत वाढ झाली आहे. तर एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या दहा महिन्यांमध्ये फुकट्या प्रवाशांविरोधात २६ लाख ५७ हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामधून १३० कोटी ४४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

तर, गेल्यावर्षी या दहा महिन्यांमध्ये २२ लाख ६३ हजार गुन्ह्यांची नोंद झाली होती. या दंडाच्या रकमेत यावर्षी १७.३८ टक्क्यांने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या