नेरळ-माथेरानच्या फेऱ्यांमध्ये वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

पर्यटक आणि स्थानिकांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेकडून अमन लॉज ते माथेरान आणि नेरळ ते माथेरान अशी मिनी ट्रेन पुन्हा सुरु करण्यात आली.‌ त्यापाठोपाठ आता या मिनी ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली असून या जादा फेऱ्या शुक्रवारपासून सुरू होणार आहेत.

सध्या किती फेऱ्या?

पूर्वी नेरळ ते माथेरान या मार्गावर मिनी ट्रेनच्या २ फेऱ्या व्हायच्या. तर, अमन लॉज ते माथेरान ट्रेनच्या एकूण १० शटल फेऱ्या व्हायच्या. पण, आता नेरळ ते माथेरान या आणि अमन लॉज ते माथेरान या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली असून ३० मार्चपासून या जादा फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

प्रचंड प्रतिसाद

जानेवारी २०१६ ते मे २०१६ मध्ये माथेरान मिनी ट्रेन अपघाताच्या ६ घटना घडल्या होत्या. यामध्ये २ घटना तर रूळांवरुन डबे घसरण्याच्या होत्या. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मे २०१६ पासून मिनी ट्रेन बंद ठेवण्यात आली. अखेर सुरक्षेची सर्व पूर्तता केल्यानंतर पहिल्यांदा अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरू केली. त्यानंतर २६ जानेवारीपासून नेरळ ते माथेरान सेवा देखील सुरू झाली असून या मार्गावर प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अशा असतील फेऱ्या

दिवस

नेरळ-माथेरान

अमन लॉज-माथेरान

एकूण

सोमवार

१४

१७

मंगळवार-गुरुवार

१२

१४

शुक्रवार

१८

२१

शनिवार-रविवार

२०

२२

   


हेही वाचा- 

माथेरानच्या मिनी ट्रेनची धमाल! फेऱ्या वाढल्या!

माथेरानची मिनी ट्रेन सुसाट, ८ दिवसांत ५ लाखांची कमाई


   

पुढील बातमी
इतर बातम्या