आता रांगेचं नो टेन्शन, मध्य रेल्वेवर लागणार १४८ 'एटीव्हीएम'

मध्य रेल्वेवरील वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वे स्थानकांतील तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी स्मार्ट कार्डवर आधारीत एटीव्हीएम मशिन बसवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भर घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या संपूर्ण डिव्हिजनमध्ये ३२९ नव्या एटीव्हीएम मशिन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील १४८ एटीव्हीएम मशिन्स येत्या महिन्याभरात बसवण्यात येणार आहेत. या आधुनिक मशिन वापरायला अधिक सोयीस्कर असणार आहेत.

सध्या ४२९ एटीव्हीएम मशिन

सध्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर ४२९ एटीव्हीएम मशिन बसवण्यात आलेल्या आहेत. त्यातील जवळपास १२९ मशिन्स जुन्या आहेत. त्यापैकी ६० ते ६५ मशिन्स अनेक कारणांनी बंद असतात. तर, ३०० मशिन्स नव्या आहेत.

टच स्क्रीनमध्ये प्राॅब्लम

२००७ मध्ये 'एक्सेल' कंपनीच्या एटीव्हीएम मशिन वापरात होत्या. या मशिनचं टच स्क्रीन लवकर खराब व्हायचं. त्यामुळे या मशिन वापरण्यास प्रवाशांना अडचणी यायच्या. पण, २०१२-१३ पासून 'फोर्ब्ज' कंपनीच्या एटीव्हीएम मशिन घेण्यात आल्या. या मशिनवर सेवा पुरवण्यासाठी रेल्वेने निवृत्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलं आहे. त्यामुळे, ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड नसेल ते प्रवासीही इथून तिकीट विकत घेऊ शकतात.

सरासरी २७ टक्के तिकीट विक्री

सध्या मध्य रेल्वेच्या एकूण तिकीट विक्रीत एटीव्हीएम मशिनमार्फत होणारी तिकीट विक्री सरासरी २७ टक्के इतकी आहे. तर काऊंटरवरून होणारी तिकीट विक्री सरासरी ५४ टक्के इतकी आहे. तर, जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक (जेटीबीएस) एक रुपये अतिरिक्त मोजून तिकीट विकत घेणारे प्रवासी १८ टक्के आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून केवळ ५.४ टक्के तिकीट विक्री होत असल्याचीही देण्यात आली आहे.

६९ 'कोटीव्हीएम मशिन'

रेल्वेकडून कॅश किंवा क्वॉईन टाकताच तिकीट देणाऱ्या एकूण ६९ ' क्वॉईन तिकीट व्हेंडर मशिन ' उपनगरीय मार्गावर बसवण्यात आल्या आहेत. ठाणे-कल्याणमध्ये प्रत्येकी ४, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस इथं प्रत्येकी ३ अशा एकूण ६९ मशिनचा त्यात समावेश आहे.


हेही वाचा-

मार्चपासून 'सिंगल तिकीट' प्रणालीवर काम सुरू

होळीसाठी मध्य रेल्वेच्या २२ विशेष गाडया


पुढील बातमी
इतर बातम्या