परळ टर्मिनसचं काम वर्षाखेरीस होणार सुरू

मध्य रेल्वे मार्गावरील परळ रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. मध्य रेल्वे या वर्षाच्या अखेरपर्यंत परळ टर्मिनस बांधण्याचं काम सुरू करण्याची शक्यता आहे. यापूर्वी रेल्वेने परळ टर्मिनसचं काम सुरू करण्यासाठी मार्च २०१९ हे वर्ष ठरवलं होतं. मात्र या कामाला २०१८ मध्ये सुरूवात करण्याचा निर्धार रेल्वेने केला आहे.

दादरची गर्दी कमी करण्यासाठी

मागच्या काही वर्षांमध्ये परळ-प्रभादेवी परिसर मुंबईतील प्राइम लोकेशन बनलं आहे. परळ स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमालिची वाढली आहे. दादर स्थानकावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने परळ स्थानकातून ठाणे तसंच कल्याणला जाणारी ट्रेन सोडण्याची तयारी सुरू केली आहे.

विस्तारीकरणाला हिरवा कंदील

परळ रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडे दोन रेल्वे ट्रॅक बनवण्यात येणार असून तिथं लोकल उभ्या करण्यात येतील. रेल्वे प्रशासनाने या अगोदरच धिम्या मार्गावरील प्लॅटफाॅर्मच्या विस्तारीकरणाच्या कामाला हिरवा कंदील दाखवला आहे.


हेही वाचा-

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे' गुरूवारी २ तासांसाठी बंद

१४ गणपती विशेष गाड्यांचा विस्तार; कोकण रेल्वेचा निर्णय


पुढील बातमी
इतर बातम्या