बेस्टच्या २०० बसगाड्या रखडल्या, कंत्राटदाराची माघार

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणखी चांगला प्रवास करता यावा यासाठी बेस्ट उपक्रमानं ताफ्यात ४०० मिनी आणि मिडी एसी बस आणण्याचा निर्णय घेतला होता. या बस भाडेतत्वावर घेण्यात येणार होत्या. तसंच, यासाठीचा खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर प्रक्रियेवेळी निविदेमार्फत २ कंत्राटदारांची निवड केली होती. या दोन्ही कंत्राटदारांनी प्रत्येकी २०० बसचा ताफा भाडेतत्त्वावर पुरविण्यास तयार दर्शविली होती. मात्र, ऐनवेळी एका कंत्राटदारानं माघार घेतली आहे.  

कमी दराचं कारण

या एका कंत्राटदारानं कमी दराचं कारण पुढे करत २०० बस पुरविण्यात असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळं बेस्टच्या ताफ्यात नोव्हेंबरमध्ये ४०० बस दाखल होण्याची शक्यता फारच कमी आहे. बेस्ट उपक्रमानं ९ जुलैपासून तिकीट दरात कपात करतानाच नोव्हेंबरपर्यंत नवीन एसी मिडी, मिनी बस सेवेत आणण्याचं जाहीर केलं होतं. मात्र, ऐनवेळी नियुक्त झालेल्या दोनपैकी एका कंत्राटदाराने दरांचे कारण पुढे करून त्यातून माघार घेतली आह.

बेस्ट प्रशासनाला पत्र

या कंत्राटदारानं दर परवडत नसल्यानं बस पुरविणं शक्य नसल्याचं पत्र बेस्ट प्रशासनास दिलं आहे. त्यामुळं निविदा मंजूर झाल्यानंतरही दायित्व नाकारणाऱ्या कंत्राटदारास काळ्या यादीत ठेवावं, अशी सूचना बेस्ट समितीच्या सदस्यांनी केली आहे. बेस्टचा ताफा सहा हजारांपर्यंत करण्याचं उद्दिष्ट ठेवलेल्या उपक्रमास हा पहिलाच धक्का बसला असून, नियोजनाप्रमाणं बस सेवेत येण्याऐवजी त्यात अडथळा आल्यानं प्रशासनास नवीन पर्याय शोधावे लागणार आहेत.


हेही वाचा -

अकरावी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर

बेस्ट कामगारांचं बेमुदत उपोषण स्थगित


पुढील बातमी
इतर बातम्या