जागतिक हवाई वाहतुकीत ६६.८ टक्के घट

कोरोना व्हायरसमुळं विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळं जागतिक हवाई वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधले जात असून, जागतिक पातळीवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळं जगभरातील हवाई वाहतूकीमध्ये मार्च महिन्यात ६६.८ टक्के घट झाली आहे. भारतात तर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर बंदी आल्याने भारतातील अवकाश जवळपास रिकामं झालं आहे.

सेंटर फॉर एशिया पँसेफिक एव्हिएशनच्या (सीएपीए) अंदाजानुसार, भारतातील विमान वाहतूक सुरु झाल्यानंतरही त्याला पूर्वीप्रमाणे प्रवाशांचा प्रतिसाद मिळायला मोठा कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यामुऴं विमान कंपन्यांच्या तोट्यात मोठी वाढ होईल व ज्या विमान कंपन्यांची आर्थिक क्षमता चांगली आहे त्या कंपन्या यामध्ये तग धरु शकतील इतर कंपन्यांचा मार्ग फार खडतर असण्याची शक्यता आहे.

पुढील ६ महिने ते वर्षभरात विमान वाहतुकीमध्ये उड्डाणांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी, भारतातील एकूण ६५० पैकी २०० ते २५० विमानं अतिरिक्त ठरतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विमान प्रवाशांमध्ये झालेली घट भरुन परिस्थिती पूर्वपदावर येण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. भारतात मे, जून व जुलै महिन्यात दरवर्षी होणाऱ्या तिकीट आरक्षणाच्या तुलनेत सध्या आरक्षण ८० टक्के पेक्षा कमी आहे. 


हेही वाचाा -

Coronavirus Updates: दक्षिण मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या २५० वर

राज्यात ७ दिवसांत 'इतकं' क्विंटल धान्याचं वाटप


पुढील बातमी
इतर बातम्या