मध्य रेल्वेवरील AC लोकलला पहिल्याच दिवशी अत्यल्प प्रतिसाद

गुरुवारपासून सीएसएमटी ते कल्याण मार्गावर AC लोकल सुरू झाली. पण या AC लोकल गाडीला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जादा भाडेदर, गर्दीच्या वेळी नसलेली सेवा इत्यादी कारणांमुळे पश्चिम आणि ट्रान्स हार्बरवरील AC लोकलकडे प्रवाशांनी पाठ फिरवली.

सीएसएमटी ते कल्याणपर्यंत AC लोकलचे तिकीट २१० रुपये, डोंबिवली ते सीएसएमटीपर्यंत २०५ रुपये, ठाणे ते सीएसएमटी १८० रुपये आणि कुर्ला ते सीएसएमटी १३५ रुपये आहे. सामान्य लोकलच्या भाडेदरापेक्षा ते अधिक आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील आणि ठाणे ते वाशी, पनवेल मार्गावरील AC लोकल गाडीला जादा भाडेदरामुळेच कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यातच मध्य रेल्वेनं गुरुवारपासून धावणाऱ्या लोकल गाडीचे भाडे जादा ठेवल्यानं प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

AC गाडीतून रात्री ८.१५ वाजेपर्यत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अत्यल्पच होती. २० तिकीट विकली गेली. तर दोनच पास काढण्यात आले. सध्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच लोकल प्रवास असून सामान्यांसाठी प्रवास सुरू झालेला नाही.

AC लोकलची पहिली फेरी पहाटे ५.४२ वाजता कुर्ल्याहून सीएसएमटीसाठी आहे. त्यानंतर सीएसएमटीहून सकाळी ६.२३ वाजता डोंबिवलीसाठी लोकल आहे. डोंबिवलीहून पहिली लोकल सकाळी ७.४७ वाजता, तर कल्याणहून सीएसएसएमटीसाठी लोकल सायंकाळी ६.५१ वाजता सोडण्यात येत आहे. सायंकाळी ५.१२ वाजता सीएसएमटीतूनही कल्याणसाठी आणि त्यानंतर थेट रात्री ८.२२ वाजता डोंबिवलीसाठी लोकल उपलब्ध आहे.


हेही वाचा

लांब पल्ल्याच्या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांना लोकलमध्ये प्रवेश

आगामी २ वर्षांत टोल नाक्यांपासून होणार मुक्तता, नितीन गडकरींची घोषणा

पुढील बातमी
इतर बातम्या